शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

अर्थसंकल्पावर कोकणचा ‘मोहोर’ - दीपक केसकरांची छाप : सर्वच क्षेत्रासाठी भरीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 18:56 IST

सिंधुदुर्ग : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर कोकणची पूर्णपणे छाप दिसून आली आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनवाढ,

ठळक मुद्देआजच्या अर्थसंकल्पावर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांची छाप प्रकर्षाने जाणविली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात २0 कोटी रूपये किंमतीचे मल्टी स्पेशालिस्ट रूग्णालय स्थापनसिंधुदुर्ग जिल्ह्याला ३५0 वर्षे पूर्ण झाल्याने या ऐतिहासीक वास्तूच्या जतन आणि संवर्धनासाठी १0 कोटी रूपयांची तरतूद

महेश सरनाईक ।सिंधुदुर्ग : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर कोकणची पूर्णपणे छाप दिसून आली आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनवाढ, आरोग्य, रोजगार निर्मिती, ऐतिहासीक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांचा विकास, आंबा-काजू या फळांच्या उत्पादनापासून अगदी कोकणची नाट्यपरंपरा जपणारे मच्छिंद्र कांबळी, कवी मंगेश पाडगावकर यांची स्मारक उभारणी अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत आजच्या अर्थसंकल्पावर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांची छाप प्रकर्षाने जाणविली.

युती शासनाच्या काळात अर्थसंकल्पात सर्वाधिक निधीची तरतूद यावेळी झाल्याचे दिसून आले आहे. कोकणातील गडकिल्ले संवर्धनातून पर्यटन विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला असून कोकणातील खार बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अस्तित्वात असणाºया खार बंधाºयांच्या दुरूस्तीसाठी ६0 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकणातील समुद्र किनाºयांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी व उद्योजक यांना विशेष प्रौत्साहन देण्यात येणार असून त्यासाठी १00 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. किनारपट्टीवरील बंदरांमध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी पायाभूत सुविधांच्या २२ कोटी ३९ लाख इतक्या खर्चाच्या ११ प्रकल्पांना सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

निसर्ग पर्यटन विकासासाठी अर्थात इको टूरिझम कार्यक्रमासाठी १२0 कोटी रूपयांची तरतूद आहे. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळातर्फे २५ कोटी रूपयांचे अतिरिक्त भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

काथ्या उद्योगातून रोजगार निर्मितीकाथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करत महिलांच्या सबलिकरणाच्यादृष्टीने शाश्वत व पर्यावरणपुरक काथ्याच्या उत्पादनाला प्रौत्साहन देण्यासाठी १0 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सागरी क्षेत्रातील विकासकामांचे नियमन व तटीय क्षेत्रातील लोकांची पारंपरिक उपजीविका वाढविणे व क्षेत्र व्यवस्थापन या प्रकल्पासाठी ९ कोटी ४0 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.सिंधुदुर्गात होणार मल्टी स्पेशालिस्ट रूग्णालयसिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा खिळखिळी बनली आहे. येथील रूग्णांना उपचारासाठी नजिकच्या गोवा राज्यात किवा कोल्हापूर जिल्ह्यात जावे लागत आहे. त्यात बहुतांशी वेळा रूग्णांचा जीवदेखील जातो. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून गोव्यात जाणाऱ्या रूग्णांसाठी शुल्क आकारणीलाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील आरोग्याच्या महत्वाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनाने पावले उचलली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २0 कोटी रूपये किंमतीचे मल्टी स्पेशालिस्ट रूग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.भारतातील पहिली पाणबुडी वेंगुर्लेतसिंधुुदुर्ग जिल्ह्यातील सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देणे तसेच पाणबुडीव्दारे होणारे समुद्र पर्यटन जागतिक दर्जाचे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातून वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक आणि परिसरासाठी भारतातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही पाणबुडी बॅटरीच्या आधारावर चालणार आहे. त्यामुळे समुद्री पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी १0 कोटीसंग्राहलय पाहण्यासाठी देशातून आणि परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी स्मरणवस्तू विक्री केंद्राची (सर्व्हेनिअर शॉप) निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षित किल्ल्यांचे त्रिमित मानचित्रण (थ्रीडी मॅपींग) करण्यात येणार आहे. यासाठीही भरीव निधीची तरतूद असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३५0 वर्षे पूर्ण झाल्याने या ऐतिहासीक वास्तूच्या जतन आणि संवर्धनासाठी १0 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी ७९ कोटींचा आराखडा मंजूरगणपतीपुळे येथे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ७९ कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला असून त्यासाठी २0 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ येथे नवीन पर्यटन स्थळ विकसीत करण्यात येणार आहे. सागरी पर्यटनाबरोबरच कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी २४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मच्छिंद्र कांबळी, मंगेश पाडगावकर स्मारकासाठी निधीमालवणी भाषा सातासमुद्रापलिकडे नेणारे नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचे सिंधुदुर्ग आणि कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ले येथे स्मारक उभारणीसाठी भरीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार